राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात सार्वजनिक ठिकणी, शाळा, कॉलेज तसेच बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ होत असल्याचे सांगितले यात मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राजेश टोपेंच्या सूचना
याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यामुळे मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्यात रेल्वे, बस, शाळा, कॉलेज, सिनेमागृह अशा बंदिस्त ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य असून मास्कचा वापर करण्यात यावा अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या प्रत्येक गाड्यांवर वाहन ट्रॅकिंग सिस्टिमची नजर!)
आरोग्य सचिवांच्या पत्रात MUST शब्द वापरला आहे त्यामुळे इंग्रजीत MUST वापरल्यामुळे मास्क सक्ती असा अर्थ होत नाही असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे आरोग्य मंत्र्यांकडून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत वाढच्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच इमारतींमध्ये संसर्गाची प्रकरणे आढळल्यास तपासणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
Join Our WhatsApp Community