अनेकदा ऑनलाईन फूड डिलिव्हरी करताना रेस्टॉरंट किंवा फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांकडून चूका होतात याआधीही अशा घटना घडल्या आहेत. ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा असाच धक्कादायक अनुभव दिल्लीतील एका ग्राहकाला आला, दिल्लीतील सुमित सौरभ या ग्राहकाने झोमॅटोवरून कॉफी मागवली असता त्यात चिकनचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भात सुमित सौरभ या ग्राहकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर करत ही माहिती दिली.
Ordered coffee from @zomato , (@thirdwaveindia ) , this is too much .
I chicken piece in coffee !
Pathetic .
My association with you officially ended today . pic.twitter.com/UAhxPiVxqH
— Sumit (@sumitsaurabh) June 3, 2022
कॉफीमध्ये चिकनचा पीस आढळला
सुमितने झोमॅटोवरुन दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली होती आणि या कॉफीमध्ये चिकनचा पीस आढळल्यानंतर त्याने ट्विटरवरुन झोमॅटो आणि थर्ड वेव्ह इंडिया या रेस्टॉरंटला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. सुमितने त्याच्या पत्नीसाठी ही कॉफी मागवली होती. त्यांची पत्नी शाकाहारी आहे. सुमित म्हणाला की, “मी झोमॅटोवरुन थर्डवेव्ह इंडिया नावाच्या रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली होती, परंतु या कॉफीमध्ये चिकनचा पीस आढळला आहे. झोमॅटोवरून ही शेवटची ऑर्डर आहे.” असे त्याने या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. यासोबतच सुमीतने सांगितले की, झोमॅटोने यापूर्वी देखील नवरात्रोत्सवाच्या काळात व्हेज बिर्यानी ऐवजी नॉनवेज बिर्यानी पार्सल केली होती. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत विविध वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यासोबतच काही युजर्स भारतात झोमॅटोला बॅन करण्याची मागणी करत आहेत.
Join Our WhatsApp Community