देशातील वाढत्या महागाईच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोलवरील 8 रुपये आणि डिझेलवरील 6 रुपयांच्या अबकारी करात कपात केली आहे. अशा परिस्थितीत देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्याचे सांगितले जात असून नवीन दरही लागू झाले आहेत. मुंबईत एक लिटर पेट्रोलच्या दरात 9.16 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मुंबईत रविवारी पेट्रोल 111.35 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्याचबरोबर डिझेल 7.49 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
(हेही वाचा- Railway स्थानकातील झटपट तिकीट पंच करणारा ‘लाल डब्बा’ का झाला इतिहासजमा?)
मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी WTI क्रूडचा दर 2 डॉलर किंवा 1.71 टक्क्यांनी वाढून 118.9 डॉलर प्रति बॅरल राहिला आहे. अशा परिस्थित, ब्रेंट क्रूडच्या किमती 2.11 डॉलर किंवा 1.79 टक्क्यांच्या उसळीसह प्रति बॅरल 119.8 डॉलरवर राहिल्या आहेत. जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तेलाचे नवीन दर काय आहेत?
जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये किती आहेत दर?
- मुंबईत रविवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपयांवर
- पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 110.95 रुपये तर डिझेलचा दर 95.44 रुपयांवर
- नागपुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 95.92 रुपये तर डिझेलचा दर 103.06 रुपये प्रतिलिटर
- नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.83 रुपये तर डिझेलचा दर 96.29 रुपये प्रतिलिटर
- औरंगाबादमध्ये पेट्रोल 113.03 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 98.95 रुपये प्रतिलिटर
- ठाण्यात पेट्रोलसाठी प्रतिलिटर 111.49 रुपये आणि डिझेलसाठी 97.42 रुपये प्रतिलिटर
- कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.32 रुपये तर डिझेलचा दर 95.82 रुपये प्रतिलिटर
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. तर, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 114.38 रुपये प्रति लिटर आहे यासह आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये 100.30 रुपये प्रति लिटर आहे.