बॉलिवूडचा दिग्गज चित्रपट निर्माता करण जोहरने नुकताच आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करणने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी उपस्थित होते. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीला हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर आणि सलमान खान यांसारख्या स्टार्सनी हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करणच्या या पार्टीत कोरोनाचा विस्फोट झाल्याचे समोर आले आहे. पार्टीत सहभागी झालेल्या ५० ते ५५ सेलिब्रिटी पाहुण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा – आम्हाला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हणत राज ठाकरेंचा पठ्ठ्या अयोध्येत दाखल)
गेल्या वर्षी देखील करण जोरहच्या घरी झालेल्या एका पार्टीमध्ये अभिनेत्री करिना कपूर, मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेने त्यांच्यावर कारवाईचे आदेशही दिले होते. आताही करणची पार्टी त्या बॉलीवू़डच्या सेलिब्रेटींसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनंतर, पार्टीनंतर करणच्या अनेक जवळच्या मित्रांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे, परंतु तो करणच्या पार्टीत नव्हता. कार्तिक आर्यनला भेटल्यानंतर एक अभिनेत्री करणच्या पार्टीत पोहोचली होती. अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन सारख्या स्टार्सनी गेल्या आठवड्यात कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत, जे स्टार्स यावर्षी IIFA 2022 मध्ये पोहोचले नाहीत त्यांच्याबद्दलही हेच कारण असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.
Join Our WhatsApp Community