जून महिन्यात रविवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना, विदर्भात आलेली उष्णतेची लाट पुन्हा वातावरणीय बदलांचे संकेत देत आहे. रविवारी गोंदियात ४६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. संपूर्ण विदर्भात गेल्या दशकभरातील हे सर्वात जास्त कमाल तापमान ठरले आहे, अशी माहिती पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सुरेश चोपने यांनी दिली.
गोंदियात तापमानवाढीचा विक्रम
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात तापमान वाढ नोंदवली जात आहे. काही ठिकाणी कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. गेले तिन्ही दिवस विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना तापमानवाढीची झळ बसली. मात्र रविवारच्या गोंदियात नोंदवलेल्या तापमानाने नवा विक्रम नोंदवला. अगोदरच मान्सूनच्या राज्यातील आगमनाला विलंब होत असताना, विदर्भात देशातील वायव्य भागांकडून येणारे उष्ण वारे प्रभावी ठरले आहेत.
(हेही वाचाः World Environment Day : जून महिन्यात तापमान झाले होते ५० डिग्री! भारतात १४०० जणांचा गेलेला बळी)
उष्णतेच्या लाटा अधिक प्रभावी
मध्यंतरीच्या दिवसांत विदर्भात मान्सूनपूर्व हलक्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वळवाच्या पावसासाठी विदर्भात पोषक वातावरण तयार झाले होते. पण वायव्य दिशेकडून वाहणारे उष्ण वारे मान्सूनपूर्व सरीनंतर विदर्भात प्रभावी ठरले. परिणामी, विदर्भात उष्णतेच्या लाटा प्रभावी ठरल्या. विदर्भात सध्या सरासरीहून दोन ते चार अंशाने जास्त कमाल तापमान नोंदवले जात आहे.
गेल्या काही वर्षांतील विदर्भातील ५ जूनचे कमाल तापमान
५ जून १९९५ – यवतमाळ – ४६.६ अंश सेल्सिअस
५ जून १९९६- पुसद – ४७.६ अंश सेल्सिअस
५ जून २००३ -वर्धा – ४६.१ अंश सेल्सिअस
५ जून २००३ – वर्धा – ४७.१ अंश सेल्सिअस
५ जून २००३ – ब्रह्रपुरी- ४७.३ अंश सेल्सिअस
(हेही वाचाः मुंबईत कोरोनाचा विस्फोट… राज्यातील आकडेवारी जाणून घ्या)
Join Our WhatsApp Community