रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) आपला रेपो दर कमी वा जास्त केल्यावर कर्जे स्वस्त व महाग झाल्याचे आपण ऐकलेच असेल. RBI च्या रेपो रेटवरच सामान्य ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाचा EMI कमी होतो आणि रेपो रेट वाढल्यास ईएमआय वाढतो. रेपो रेटमुळे आपल्या कर्जावर कसा परिणाम होते ते पाहुया आणि रेपो रेट म्हणजे काय ते जाणून घेऊया.
रेपो रेट म्हणजे काय ?
रेपो रेट एक असा दर असतो ज्यावर बॅंकांना आरबीआयकडून कर्ज दिले जाते. बॅंका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असतात. रेपो रेट कमी झाल्यास बॅंकांना मिळणारे कर्ज स्वस्त होते. परिणामी सामान्य नागरिकांना दिलासा मिळतो. बॅंका रेपो रेटमध्ये बदल झाल्यास त्यानुसार आपल्या ग्राहकांना कर्ज स्वस्त करुन देतात. अर्थातच गृह कर्ज आणि वाहन कर्जासह इतर कर्जांवरील ईएमआय स्वस्त किंवा महाग होऊ शकतो.
( हेही वाचा: कर्ज घेणे महागणार? रिझर्व्ह बॅंक रेपो दरात आणखी वाढ करणार )
रिव्हर्स रेपो रेट
रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे नावावरुनच एकमेकांच्या विरुद्धार्थी असल्याचे स्पष्ट होते. रिव्हर्स रेटचा अर्थ विविध बॅंकांचा आरबीआयमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बॅंकांना मिळणारे व्याज होय. बॅंकांकडे जो अतिरिक्त पैसा असतो तो रिझर्व्ह बॅंकेकडे जमा केला जातो. यावर बॅंकांनाही व्याज मिळते. रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून आरबीआय बाजारपेठेतील कॅश लिक्विडी अर्थात कॅशच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकते. बाजारात खूप रोख रक्कम असल्यास आरबीआय रिव्हर्स रेपोमध्ये वाढ करत असते. जेणेकरुन बॅंका जास्त व्याज मिळवण्यासाठी आपल्याकडील जास्तीत जास्त रोख रक्कम रिझर्व्ह बॅंकेत जमा करतील.
Join Our WhatsApp Community