काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल्याच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. आता या हत्येचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील दोन आरोपी हे पुण्याचे असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात 8 लोकांची छायाचित्रे समोर आली होती. त्यापैकी एकाला देहरादूनमधून पकडले आहे. तर संतोष जाधव आणि सौरव महांकाल हे दोघे पुण्याचे असल्याची माहिती आहे.
कोण आहे संतोष जाधव
संतोष जाधवचे नाव पुणे मंचरमधील गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखेलेच्या हत्या प्रकरणात समोर आले होते. ओंकारच्या हत्या प्रकरणात संतोष जाधव फरार आहे. पुणे क्राईम ब्रांच संतोषचा शोध घेत आहे. संतोष जाधवने सूर्य उगवताच तुला संपवून टाकीन असे स्टेटस टाकले होते. यावर ओंकारने लिहिले होते की, कुणीही येऊ द्या, संतोषला भेटणार आणि ठोकणार. यानंतर शूटरने बाईकवरुन येत ओंकार बाणखेलेची 1 ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या हत्या केली होती. तेव्हापासून संतोष फरार आहे. आता त्याचे नाव सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही समोर आले आहे.
( हेही वाचा: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी: 198 ट्रेन रद्द; अशी तपासा रद्द झालेल्या गाड्यांची यादी )
सुरक्षा काढून घेतल्यावर सिद्धूची हत्या
सिद्धू मुसेवाला याला पंजाब सरकारने सुरक्षा दिली होती. सरकारने ही सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर मुसेवालाची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला याचे एका महिन्यानंतर लग्न करणार होते. मुसेवाला यांची अंतिम यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी या ट्रॅक्टरवर शूट केली होती.
Join Our WhatsApp Community