राज्यातील शाळा सुरू होण्यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील शाळा सुरू होण्याचा मुहुर्त शिक्षणमंत्र्यांनी सांगितला असून त्यानुसार, राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासह ते असेही म्हणाले की, १३ जूनला फक्त पहिलीच्या वर्गाच्या शाळांसाठीचे पहिले पाऊल असणार आहे. त्यामुळे इतर वर्गाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार आहेत.
काय म्हणाल्या शिक्षणमंत्री?
महाराष्ट्रात सध्या कुठेही मास्क सक्ती नाही. यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघता शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे. सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी स्थिती काय आहे, याची माहिती मिळेल. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.
(हेही वाचा – Special Coin: पंतप्रधान मोदी जारी करणार नाण्यांची नवी सिरीज, ‘ही’ आहेत वैशिष्ट्य)
बारावीच्या निकालासंदर्भात प्रश्न केल्यानंतर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले. बारावीच्या निकालाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, बारावीचा निकाल लवकरच लागेल.
Join Our WhatsApp Community