आपल्याला नेहमीच जगातील सर्वात जुनी, ऐतिहासिक गोष्ट कोणती हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. जगातील सर्वात जुने आणि सर्वात जास्त वय असणारे झाडं कोणतं आणि नेमकं ते झाडं कोणतं हे तुम्हाला माहिती आहे का? दक्षिण चिलीमधील अलर्स कोस्टेरो नॅशनल पार्कमध्ये (Alerce Costero National Park) हे जगातील सर्वात जुने झाड आहे. हे सायप्रस झाड असून ज्याला हिंदीत सनौवर म्हणतात. विशेष म्हणजे या झाडाचे वय पृथ्वीवरील सर्व झाडांपेक्षा जास्त आहे. म्हणूनच शास्त्रज्ञ या झाडाला ‘ग्रेट ग्रँडफादर’ असेही म्हणताना दिसतात.
नामशेष, दुर्मिळ होत चाललेली प्रजाती
मिळालेल्या माहितीनुसार, या सायप्रस वृक्षाचे वय ५ हजार वर्षांपेक्षा जास्त असून ५,४८४ वर्षे आहे. पॅरिसमधील क्लायमेट अँड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस प्रयोगशाळेतील पर्यावरणशास्त्रज्ञ जोनाथन बारिचविच यांनी सांगितले की, आम्ही त्या वृझाचे वय, आकार, वाढण्याची क्षमता इत्यादी संगणक मॉडेलद्वारे तपासले आहे. ही झाडाची एक नामशेष आणि दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातीपैंकी एक असल्याचे आढळून आले आहे. जोनाथन यांनी पुढे असेही सांगितले की, कॉम्प्युटर मॉडेलच्या माध्यमातून या वृक्षाच्या ८० टक्के विकासाची गोष्ट कळली आहे. हे झाड सांगितलेल्या वयापेक्षा कमी असण्याची शक्यता फक्त २० टक्के आहे. कारण या झाडाच्या खोडाचा व्यास ४ मीटर असल्याने त्याचे वलय मोजता येत शक्य नव्हते. या झाडाने शेवटच्या जुन्या झाडाचा विक्रम मोडला आल्याचे सांगितले जात आहे.
शास्त्रज्ञांनी काय म्हटले?
यापूर्वी, कॅलिफोर्नियाच्या व्हाईट माउंटनमध्ये असणाऱ्या ब्रिस्टलकोन पाइन हे सर्वात जुने झाड असल्याचे म्हटले जात होते. या सर्वाधिक जुन्या झाडाचे नाव मेथुसेलाह असे आहे. त्याचे वय ४ हजार ८५३ वर्षे आहे. पण या ग्रेट ग्रँडफादर झाडाचे वय ५ हजार ४८४ वर्षे आहे. जोनाथन यांनी असेही सांगितले की, काही शास्त्रज्ञ या समोर आलेल्या माहितीशी सहमत नाहीत, परंतु झाडाला छिद्र पाडल्याशिवाय किंवा कापल्याशिवाय त्याचे अचूक वय शोधण्याचा अधिक अचूक मार्ग असू शकत नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
जर झाडाच्या आतील घटकाचे मोजमाप करणे अशक्य असेल तर त्याचे नेमके वय ठरवणे कठीण आहे, असे कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ट्री रिंग लॅबोरेटरीचे संचालक एड कुक यांनी म्हटले आहे. परंतु जोनाथनने ज्या तंत्राने या झाडाचे वय मोजले, अभ्यास केला आहे तो साधाकण सत्य असू शकतो, तसेच हे झाड ५ हजार वर्षांहून अधिक जुने असल्याची पुष्टी झाली देखील झाल्याचे सांगितले जात आहे.