कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे आषाढी वारी होऊ शकली नाही. मात्र, यंदाचा वारी व सोहळा कोरोना निर्बंधमुक्त होणार आहे. त्यामुळे यंदा मास्कशिवाय ‘ग्यानबा तुकारामा’चा जयघोष वारीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. आषाढी वारीसाठी 15 लाख भाविक पंढरपुरात जमतील अशी शक्यता आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पालखी मार्गावरील सोहळ्यासाठी कायमस्वरुपी जागा आरक्षित
पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्यमुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टॅंकर वाढवावेत. पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सूचना कराव्यात. पालखी मार्गावरील वाहतूक नियोजन करावे. आळंदीला वाहनतळासाठी जागा संपादन करावे. संत सोपानदेव पालखी मार्गावरील रस्त्यातील खड्डे जिल्हा परिषदेने त्वरित बुजवावे. पालखी मार्गावरील सोहळ्यासाठी कायमस्वरुपी जागा आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही पवार यांनी सांगितले.
(हेही वाचा – Varanasi Serial Blast Case: 16 वर्षांनंतर निकाल, दोषी वलीउल्लाला फाशीची शिक्षा)
विधान भवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थित पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community