भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरले असून लांबच्या प्रवास करताना मुख्यत: रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. विमान प्रवासापेक्षा ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान प्रवासी जास्त सामान घेऊ जाता येते. परंतु कधी-कधी रेल्वे प्रवासादरम्यान आपण आपले सामान रेल्वेत विसरतो. त्यानंतर अनेक प्रवासी आपले सामान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत नाही आणि सामान सोडून देतात. प्रवासी विसरून गेलेल्या सामानाचे रेल्वे पुढे काय करते याविषयी आपण जाणून घेऊया…
( हेही वाचा : SBI बॅंकेने ग्राहकांना दिल्या या ५ टिप्स! लहानशी चूकही करू शकते तुमचे बॅंक खाते रिकामे, जाणून घ्या…)
रेल्वे पुढे सामानाचे काय करते ?
- जर तुम्ही तुमचे सामान विसरलात तर याबाबत ताबडतोब रेल्वे अधिकाऱ्यांसोबत आरपीएफ (RPF)पोलिसांना याची माहिती द्या.
- एखादा प्रवासी रेल्वेत सामान विसरून गेला तर त्याचे सामान पुढील स्थानकावर जमा केले जाते. रेल्वे कर्मचारी स्टेशन मास्टरकडे हे सामान जमा करतात. यानंतर सामान काय आहे या आधारे पुढील प्रक्रिया निश्चित केली जाते.
- जर तुम्ही गाडीत दागिने विसरलात तर ते २४ तास स्टेशनवर ठेवले जातात. जर कोणी २४ तासात हे दागिने घ्यायला आले नाही तर योग्य खात्री करूनच मालकाकडे दागिने सोपवले जातात. अन्यखा हे दागिने झोन कार्यालयात पाठवले जातात.
- जर एखादे सामान तुम्ही गाडीत विसरलात तर तीन महिने हे सामान स्टेशन कार्यालयात ठेवण्यात येते. तीन महिन्यात जर कोणी हे सामान घ्यायला आले नाही तर ते पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते अन्यथा सामान बराच काळ पडून राहिल्यास सामानाची विक्री तसेच विल्हेवाट लावण्याचेही नियम आहेत.
- सामान पुन्हा प्रवाशाच्या स्वाधीन करण्याआधी रेल्वे प्रशासनाकडून कागदपत्रे, ओळख दाखवावी लागणार आहे. यानंतरच तुमचे सामान तुम्हाला परत मिळेल अलिकडच्या काळात काही स्थानकांवर सामान घरी पोहोचवण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.