भारतात फाळणीची पुनरावृत्ती होऊ देऊ नका; रणजीत सावरकर यांचे आवाहन

146

जेव्हा जेव्हा देशात मुसलमानांची संख्या वाढते, तेव्हा ते हिंदूंच्या वरचढ होतात. आज पुन्हा विभाजित भारतात मुसलमानांची संख्या २२ टक्के झाली आहे. जर १९४७सालची पुनरावृत्ती २०४७ मध्ये होऊन मुसलमानांची लोकसंख्या ३५ टक्के झाली, तर पुन्हा भारताची फाळणी होईल आणि ६५ टक्के हिंदू ३५ टक्के मुसलमानांना रोखू शकणार नाहीत. कारण ते जातीपातीत विभागलेले आहेत, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर म्हणाले.

गांधींमुळे फाळणीची बीजे रोवली 

स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर चरित्राचे गाढे अभ्यासक व अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर जालना येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर बोलत होते. या व्याख्यानाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, जालना यांनी केले होते. १९१९ साली सुरु झालेल्या खिलाफत चळवळीचा भारताशी काहीही संबंध नव्हता. तुर्कस्तानातील मुसलमानांनी त्यांच्या खलिफाला काढून टाकले होते, त्यावर ती चळवळ सुरू झाली होती. तरीही मोहनदास करमचंद गांधी यांनी त्याचे समर्थन केले. त्यानंतर मुसलमानांनी दंगली केल्या, केरळमधील मलबारमध्ये मोपला मुसलमानांनी हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले, अत्याचार केले. त्या मोपला मुसलमानांना मात्र ‘माय ब्रेव्ह मोपला ब्रदर्स’ असे संबोधून त्यांचे समर्थन गांधींनी केले होते. त्यावेळी गांधी म्हणाले, मोपाल्यांना जो धर्म वाटतो, त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांना योग्य वाटणाऱ्या मार्गाचा त्यांनी अवलंब केला आहे. मुसलमान युद्धखोर आणि रानटी प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन हिंदूंनी केले नाही. म्हणूनच या दंगलीचा दोष हिंदूंनाही लागतो, असे गांधी त्यावेळी म्हणाले होते. जेथे मुसलमानांच्या धार्मिक अधिकाराचे रक्षण होत नसेल, तेथे त्यांनी राहू नये, असेही मोहनदास करमचंद गांधी म्हणाले होते, अशी माहिती रणजीत सावरकर यांनी दिली. आणि यामुळेच फाळणीची आणि इस्लामी राज्याची आकांक्षा मुस्लिमांच्या मनात जागृत झाली.

(हेही वाचा औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत कधी होणार याची घोषणा सभेत करणार का? मनसेच्या गजानन काळेंचा सवाल)

हिंदूंनी सावध होण्याची गरज

२०२१ सालीही भारतात पुन्हा खिलाफत चळवळ आणि मोपला दंगलीची पुनरावृत्ती झाली. भारतातील मुस्लिमांचा संबंध नसतानाही CAA च्या निमित्याने देशभर हिंसक आंदोलने झाली आणि मोठ्या दंगलीही. या दंगलीत हिंदूच मारले गेले. दिल्लीचार दिवस जळत होती. पण आज आपण खिलाफत आणि मोपला दंगली तर विसरलोच पण दिल्ली दंगल आणि CAA आंदोलन हि विसरलो.

१९४७ साली अखंड भारतात मुसलमानांची संख्या जेव्हा ३५ टक्के झाली तेव्हा भारताचा एक- तृतीयांश भाग तोडला गेला आणि पाकिस्तान निर्माण झाला झाला. फाळणी नंतर १९४७ साली भारतात ८ टक्के मुसलमान होते, तर पाकिस्तानात १५ टक्के हिंदू होते. आज ७५ वर्षांत पाकिस्तानात हिंदू जेमतेम एक-दीड टक्का उरले आहेत. तर भारतात मात्र मुसलमानांचीही संख्या ८ टक्क्यावरून २२ टक्के वाढली आहे. त्यामुळे जेथे जेथे हिंदू अल्पसंख्यांक होतात, तिथे त्यांचे निर्मूलन होते. परंतु आजही हिंदू सावध नाहीत म्हणून त्यांच्या छाताडावर पाय ठेवून अकबरूद्दीन ओवैसी मराठवाड्यात येऊन औरंग्याच्या थडग्यावर डोके टेकवून गेला, असे ते म्हणाले.

इतिहास आजही सांगतो ज्या ठिकाणी मुसलमान बहुसंख्य आहेत, तेथे लोकशाही संपते. भारतात लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर हिंदू बहुसंख्य राहण्याची गरज आहे. आज भारतात असलेल्या ८० टक्के हिंदू समाजाला आपले संरक्षण करण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी म्हणून जातीपाती विसरून हिंदूंनी एकत्र येऊन हिंदू हिताचा विचार करणाऱ्या उमेदवाराला निवडून  दिले पाहिजे. आज वीर सावरकर म्हणाले त्या प्रमाणे ‘जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा’,  हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे असे रणजीत सावरकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.