दक्षिण कर्नाटकातच आठवड्याभरापासून रेंगाळलेल्या नैऋत्य मोसमी वा-यांनी तब्बल आठवड्याभरानंतर मंगळवारी पुढे वाटचाल केली. परंतु गोव्याऐवजी मान्सूनचे वारे पूर्वेकडे आगेकूच करत असल्याचे भारतीय वेधशाळेने जाहीर केले आहे. नैऋत्य मोसमी वा-यांनी मंगळवारी तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराजकाळ आणि बंगालच्या उपसागरातील भागांत प्रवेश केला. मान्सून मंगळवारी कर्नाटक राज्याच्या दिशेकडून बंगालच्या उपसागरापर्यंत पुढे सरकला. बंगालच्या उपसागरासह मान्सूनने पश्चिम बंगालमधील सिलिगुरीपर्यंत मजल मारली. मात्र राज्याकडील नैऋत्य मोसमी वा-यांबाबत पुढे सरकण्यास पोषक वातावरण नसल्याने राज्यातील वरुणराजाच्या आगमनाबाबत भारतीय वेधशाळेने कोणतीच माहिती दिलेली नाही.
मान्सून पुढे सरकला
जूनचा पहिला आठवडा सरला असला तरीही राज्यात मान्सूनपूर्व पाऊस तितकासा पडलेला नाही. एकमेव कोल्हापूरातच जून महिन्यातील सरासरी मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन झाले आहे. कोल्हापूरात आठवड्याभरात ४१ मिमी पावसाची नोंद झाली. त्या तुलनेच जेऊरमध्ये २० मिमी, महाबळेश्वरमध्ये ७ मिमी, सांगलीत १२ मिमी, साता-यात २ मिमी तर सोलापूरात केवळ १ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबदमध्ये १ मिमी, तर दक्षिण कोकणातही प्रत्येकी १ मिमी पाऊस पडला आहे.
( हेही वाचा : पाकिस्तानचे होणार तीन तुकडे? असे असतील नवे प्रांत)
राज्यभरात बुधवारपासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व सरी बरसतील. कोकणात ८ जून पासून वावटळीसह मान्सूपूर्व पावसाला सुरुवात होईल. १० जूनपर्यंत सोसाट्याच्या वा-यासह मान्सूपूर्व पावसाचा तीन दिवस मुक्काम राहील. विदर्भातही सोसाट्याचा वारा वगळता तीन दिवस मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात ८ जून २०२२ पासून दोन दिवस मान्सूनपूर्व पाऊस राहील.
Join Our WhatsApp Community