स्वस्तात धान्य मिळवण्यासाठी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्डचा वापर करण्यात येतो. गेली कित्येक वर्ष रेशन कार्डद्वारे ग्राहकांना स्वस्तात धान्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पण आता काही व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे कार्डधारक रेशन कार्डवर स्वस्त धान्य घेण्यास पात्र नाहीत, अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
रेशन कार्डवर स्वस्त आणि मोफत धान्य घेण्याची सुविधा ही केवळ आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांनाच देण्यात येते. असे असताना सुद्धा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते नागरिक सुद्धा रेशन कार्डवर स्वस्त धान्य घेण्याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना आता रेशन कार्डवर धान्य खरेदी करता येणार नाही. मात्र, पूर्वीप्रमाणेच अॅड्रेस प्रूफ म्हणून रेशन कार्डचा वापर करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः ट्रेनमधून जास्त वजनाचे सामान नेताना खरंच दंड भरावा लागणार? हे आहे रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण)
या व्यक्तींचे कार्ड रद्द होणार
- ज्या व्यक्तींकडे एसी सारखी उपकरणे आणि कार, ट्रॅक्टर यांसारखी वाहने आहेत.
- ज्या व्यक्तींचे घर 100 स्क्वेअर मीटरपेक्षा मोठे आहे आणि ज्यांच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त जमीन आहे.
- ग्रामीण भागात राहणा-या ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
- शहरी भागात राहणा-या ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
- जे आर्थिकदृष्ट्या सधन व संपन्न आहेत.
(हेही वाचाः ‘या’ बँकांमध्ये तुमचं अकाऊंट आहे? मग तुम्हाला लोनसाठी होणार फायदा! RBI चा मोठा निर्णय)
… तर कारवाई होणार
तसेच अपात्र रेशन कार्ड धारकांना आपले रेशन कार्ड जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रेशन कार्ड डिलर किंवा रेशन कार्ड ऑफिसमध्ये जाऊन आपण आपले रेशन कार्ड सरेंडर करू शकता. अन्यथा भविष्यात कारवाई होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community