आज राज्यात १ हजार ८८१ नव्या कोरोनाच्या रुग्णांचे निदान झाले. राज्यातील कोरोनाची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच जाणार असल्याने शरीरात तापाची लक्षणे असली तरीही कोरोना चाचणी करा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. राज्यात मृत्यूची संख्या फारशी नसली तरीही कोरोना चाचणी तातडीने करुन उपचारांना सुरुवात करा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पाच हजारांच्यावर
१ हजार ८८१ नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत केवळ ८७८ कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुन्हा थोडे खाली सरकत ९८.०२ टक्क्यांवर आले. वाढत्या कोरोना रुग्णांच्या केसेसमुळे रुग्ण कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण आता ०९.७३ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली गेली. राज्यात आता ८ हजार ४ ३२ सक्रीय कोरोनाबाधितांवर उपचार दिले जात आहेत. कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत आता पाच हजारांच्यावर गेली आहे. सद्यस्थितीत मुंबईत ५ हजार ९७४, ठाण्यात १ हजार ३१० आणि पुण्यात ५६२ कोरोनाबाधितांवर उपचार दिले जात आहेत.
(हेही वाचा पुण्यात पुन्हा आढळला ओमायक्रॉनचा उपप्रकार)
Join Our WhatsApp Community