आधार कार्ड (Aadhaar Card) भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. अलिकडे शाळेत प्रवेश घेण्यापासून, बॅंकेचे कामकाज, सिम कार्ड खरेदी करताना, पासपोर्ट काढताना अशा सर्व महत्त्वाच्या कामकाजात आधार कार्ड अनिवार्य असते. आधारमध्ये तुमची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती असते. आधार कार्डवरील बऱ्याच वेळा अनेकांना आवडत नाही किंवा वयानुसार हा फोटो बदलणे आवश्यक असते म्हणूनच आधार कार्डवरील फोटो बदलायचा असल्यास काळजी करण्याचे कारण नाही, या सोप्या प्रक्रियेने सहज बदला तुमचा आधार कार्डवरील फोटो…
( हेही वाचा : IBPS बॅंकेत 8106 रिक्त जागांसाठी भरती सुरू!)
असा बदला आधार कार्डवरील फोटो
- आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला केवळ २५ रुपये भरावे लागतील.
- आधार कार्डवरील फोटो खराब झाल्यास, त्यात तुम्हाला मनाप्रमाणे अथवा वयाप्रमाणे बदल करायचा असल्यास तुम्हाला UIDAI ची अधिकृत वेबसाईटला https://uidai.gov.in/ भेट द्यावी लागेल. येथे log in करून फॉर्म भरून डाऊनलोड करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जवळील आधार केंद्रावर जमा करावा लागेल. पासपोर्ट, मतदान ओळखपत्र यासारखे कागदपत्र पुरावा म्हणून तुम्हाला सादर करावे लागतील.
- आधार केंद्रावर तुम्ही फोटो आणि बायोमेट्रीक माहिती भरा. यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. ज्याद्वारे तुम्ही आधारवरील फोटो बदलला आहे की नाही हे तपासू शकता. त्यानंतर तुम्ही २५ रुपये भरा.
- या प्रक्रियेनंतर तुम्ही Registered केलेल्या पत्त्यावर तुम्हाला आधार कार्ड मिळेल.