सरकारी रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कामगार कंत्राटी नियुक्ती पद्धतीवर संतापले आहेत. ६ जूनपासून जेजे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सरकारविरोधात कंत्राटी पद्धत रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहेत.
( हेही वाचा : Ghatkopar ward 130 : राखीसमोर भाजपचा उमेदवार कोण?)
भविष्यात बेमुदत आंदोलनाचा इशारा
राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी संलग्न असलेली सरकारी रुग्णालये तसेच मुंबई महापालिकेच्या चारही प्रमुख रुग्णालयात लिपिक आणि वॉर्डबॉयची 40 टक्के कमतरता आहे. ही पदे भरण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करू नका, या मागणीसाठी जेजेतील चतुर्थ श्रेणी कामगार संघटनेने तीन दिवस दोन तास काम बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र दोन दिवस सकाळी आठ ते दहा दरम्यान काम बंद आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळाला. ८ जूनला आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने चर्चेसाठी न बोलावल्यास भविष्यात बेमुदत आंदोलनाचा इशारा बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिला.
Join Our WhatsApp Community