राज्यसभा निवडणूक : आमदारांची ‘ट्रायडेंट’, ‘ताज’ मध्ये ‘सोय’! भाडे ऐकूण व्हाल थक्क

165

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना – भाजपा यांच्यात थेट लढत आहे. मात्र राज्यसभेत आपलाच विजय होणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे, तर भाजपा आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल. काँग्रेसनेही त्यांच्या आमदारांसाठी पंचतारांकित हॉटेल बुक केले आहे. येत्या १० जून रोजी मतदानापर्यंत या आमदारांचा मुक्काम या हॉटेलमध्येच असणार आहे. राज्यसभेचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यासाठी पाण्यासारखा पैसाही वाहत आहे.

कोणत्या हॉटेलचे किती भाडे? 

ट्रायडेंट हॉटेल – एका दिवसाचे भाडे

  • सुप्रिअर रुम – सिंगल – १८,५०० रु.
  • डबल रुम  – २० हजार
  • प्रिमिअम रुम – सिंगल – २२ हजार
  • तर डबल – २३ हजार ५००

(हेही वाचा ट्रायडेंटमध्ये ‘मविआ’चे शक्तिप्रदर्शन, १२ अपक्ष आमदार उपस्थितीत राहिल्याचा दावा)

प्रिमिअम ओशन व्ह्यू रूम 

  • सिंगल – २३ हजार ५००
  • डबल २५ हजार

प्रेंसिडेंटल सूट – ३ लाख रुपये

ताज हॉटेल –  एका दिवसाचे भाडे

  • लग्झरी रुम – २२ हजार रुपये
  • लग्झरी ग्रॅंड – २५ हजार रुपये
  • लग्झरी ग्रॅंड (Sea View) – २७ हजार ५०० रुपये
  • ताज क्लब रुम – ३२ हजार रुपये
  • ग्रॅंड लग्झरी रुम – १ लाख ६ हजार रुपये

या भाड्याचा हिशोब केला तर पुढील ३ दिवस हे आमदार हॉटेलमध्ये थांबले, तर एका आमदारांमागे हजारो रुपये खर्च होणार आहेत. अशातच महाविकास आघाडीचे १४५, भाजपाचे ११५ आमदारांचा हॉटेल खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे लोकांनी निवडून दिलेल्या या आमदारांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.