मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या आधी शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी केलेल्या बॅनरबाजीवरुन आता राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या बॅनरबाजीवर आक्षेप घेत ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, ही निर्बुद्धपणाचा कळस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोयरिकी आणि नातेवाईक एकदा पाहावेत म्हणजे शिवसैनिक शेंडी जानव्याचा उल्लेख बंद करतील.
दरम्यान, चेतन कांबळे यांनी औरंगाबादेतल्या बॅनरवर एकच नारा शेंडी जानव्याला हद्दपार करुन, ठाकरे सरकारला आडवे याल, तर आडवे करु, असे लिहिले आहे. त्यावर आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे.
बॅनरवर काय लिहिलेय?
उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी त्यांच्या ट्विटरवर तसेच शहरात काही बॅनर लावले आहेत. त्यावर शेंडी जानवे तोडा, शिवसेना जोडा असा आशय आहे. त्यासोबतच ज्यादा द्याल ताण तर उलटा घुसेल बाण, असादेखील उल्लेख आहे. एकच नारा- शेंडी जानव्याला हद्दपार करु. ठाकरे सरकारला आडवे याल तर आडवे करु, अशा प्रकारचे बॅनर लावून जाहिरातबाजी केली आहे. या जाहिरातबाजीनंतर आता कांबळेंवर टीका केली जात आहे.
( हेही वाचा Maharashtra HSC result: बारावीचा निकाल जाहीर;राज्याचा निकाल 94.22 टक्के; कोकण आघाडीवर तर मुंबईची घसरगुंडी )
काय म्हणाले आनंद दवे?
चेतन कांबळे यांनी केलेली बॅनरबाजी हा निर्बुद्धपणाचा कळस आहे. त्यांना शिवसेना माहिती आहे, ठाकरे परिवार माहीत आहे. ठाकरे परिवाराच्या सोयरिकी माहीत आहेत. ठाकरेंच्या घरात कुठल्या मुली आल्या आणि ठाकरेंच्या मुली कोणत्या घरी गेल्या याचा जरी अभ्यास केला, तरी अशी वक्तव्ये त्यांच्याकडून येणार नाहीत.
Join Our WhatsApp Community