भाजपाकडून विधान परिषदेच्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून उमा खापरे, श्रीकांत भारतीय या नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना मात्र संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षाकडून पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना डावलण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एवं बिहार राज्यों में होने वाले आगामी विधान परिषद द्विवार्षिक चुनाव- 2022 हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/cOzfHhaDQY
— BJP (@BJP4India) June 8, 2022
राज्यात विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काॅंग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे.
( हेही वाचा: तोफ धडाडणार म्हणे, साधी लवंगी वाजली तरी पुरे; मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका )
फडणवीसांनी खूप प्रयत्न केले
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली नाही. देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनानंतरही पंकजांचे नाव डावलण्यात आले. याविषयी चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत, याबाबत डिप्लोमेटिक प्रतिक्रिया दिली. हा सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. आम्ही कोरी पाकीटे असतो. देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंसाठी खूप प्रयत्न केल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community