२३ वर्षांच्या दमदार कामगिरीनंतर, मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

142

भारताची धडाकेबाज फलंदाज मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. मिताली राजने तिनही फाॅर्ममध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. मितालीने बुधवारी दुपारी सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. आपल्या 23 वर्षांच्या दमदार कामगिरीनंतर मितालीने निवृत्तीची घोषणा केली आहे.

मिताली राजचे ट्वीट

निवृत्ती संदर्भातील ट्वीटमध्ये मिताली म्हणाली की, “तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! मी तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनासह माझ्या दुसऱ्या कारकिर्दीची सुरुवात करत आहे. जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता, गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.” असे तिने आपल्या ट्विटमध्ये नमूद केलेय. तसेच “मला मिळालेल्या सर्व पाठिंब्याबद्दल मी बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांचे आभार मानू इच्छिते – प्रथम एक खेळाडू म्हणून आणि नंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून.”

( हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या औरंबागाद मधील सभेसाठी कोरोना चाचणी बंधनकारक? )

जय शाह यांनी दिल्या शुभेच्छा

मिताली राजने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मितालीला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटमध्ये जय शाह म्हणाले की, “एक अद्भुत कारकीर्द संपुष्टात येते! मिताली राज, भारतीय क्रिकेटमधील तुमच्या अतुलनीय योगदानाबद्दल धन्यवाद. मैदानावरील तुमच्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय महिला संघाला गौरव प्राप्त झाला आहे. मैदानावरील या शानदार खेळीबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!” अशा शब्दात शाह यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.