कोरोना रुग्णसंख्येत वाढ; राज्यात एकाच दिवसात आढळले दोन हजार रुग्ण

155

राज्यात बुधवारी एकाच दिवसात कोरोनाचे 2 हजार 701 रुग्ण आढळल्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 806 वर पोहोचली आहे. राज्यात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के एवढे खाली घसरले आहे. मुंबईत मंगळवारपासून रुग्णासंख्या हजारीपार जात असतानाच आता संपूर्ण परिसरातच रुग्ण वाढू लागले आहेत.

बुधवारी 1 हजार 327 कोरोना रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज दिला गेला. मात्र कोरोना बरे होण्याचे प्रमाण नव्या रुग्ण नोंदीच्या तुलनेत सातत्याने 50 टक्क्याहून कमीच दिसून येत आहे. मुंबईत आता सात हजार रुग्णांना उपचार दिले जात आहे. ठाण्यात 1 हजार 482, पुण्यात 650, पालघरमध्ये 181, रायगडमध्ये 253 कोरोनाबाधितांना उपचार दिले जात आहेत.

रुग्णसंख्या वाढत असलेली शहरे 

  • मुंबई – 1 हजार 765
  • ठाणे शहर – 216
  • ठाणे ग्रामीण – 36
  • नवी मुंबई – 208
  • पनवेल – 84
  • वसई – विरार – 60
  • मीरा भाईंदर – 57
  • कल्याण – डोंबिवली – 35
  • रायगड – 29
  • पालघर – 13
  • पुणे मनपा – 132
  • पुणे ग्रामीण – 28
  • पिंपरी चिंचवड – 37
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.