दोन महिन्यांमध्ये २४३२ खड्डयांची मलमपट्टी

182

मुंबईत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्डयांची समस्येमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी खड्डयांची मलमपट्टीचे काम हाती घेण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी दोन महिन्यांमध्येच तब्बल २४३२ खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

( हेही वाचा : कितीही दावे झाले तरी निकालानंतरच कळणार अपक्षांची साथ कोणाला?)

पावसाळापूर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम

मुंबईत पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांना कोल्डमिक्सच्या साठ्याचा पुरवठा करण्यात आला आहे. पावसाळापूर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभाग स्तरावर ५० लाख रुपयांचा निधी आणि रस्त्यांचा खराब भागाची मलमपट्टी करण्यासाठी दीड कोटी अशाप्रकारे प्रत्येक अशाप्रकारे एकूण दोन कोटी रुपये प्रत्येकी विभाग कार्यालयांना मागील वर्षी देण्यात आला होता.

मात्र, प्रत्येक विभागांमध्ये प्रत्येकी ५० लाख रुपयांचा खर्च खड्डे बुजवण्यासाठी मंजूर केला होता.रस्त्यांवरील खड्डयांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही विभाग कार्यालयांवर असल्याने एप्रिल ते ६ जून या कालावधीत आतापर्यंत संपूर्ण मुंबईत २४३२ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा रस्ते विभागाने केला आहे.महापालिकेने २४ विभाग कार्यालयांना सुमारे १९०० मेट्रीक टनच्या कोल्डमिक्सच्या ७५ हजार ९७३ पिशव्यांचा पुरवठा केला आहे. तब्बल ३५८७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवरील खड्डे बुजवण्यात आल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

याबाबत उपायुक्त( पायाभूत सुविधा प्रकल्प) संजय महाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळापूर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम विभाग कार्यालयांमार्फत केले जात असून यासाठी आवश्यक असलेले कोडमिक्सचा पुरवठा केला आहे. आतापर्यंत विभाग कार्यालयांकडून आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत २४३२ खड्डे बुजवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बुजवलेले एकूण खड्डे: २४३२

  • बुजवलेल्या प्रभागांची संख्या
  • गोवंडी,देवनार (एम पूर्व) : ३८६
  • मालाड(पी उत्तर) : ३६४
  • अंधेरी पश्चिम (के पश्चिम) : २९१
  • वडाळा,अँटॉपहिल( एफ उत्तर) :२५४
  • गोरेगाव (पी दक्षिण ): २१३
  • मस्जिद (बी विभाग) : १८३
  • कुलाबा, नरिमन (ए विभाग): १६२
  • अंधेरी पूर्व : १३२
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.