स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. सतत फोनच्या वापरामुळे फोन गरम होऊन खराब होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मोबाईल फोन गरम होऊन स्फोट झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे उष्णतेमध्ये फोनची अतिरिक्त काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
( हेही वाचा : स्मार्ट कार्ड नसेल तर एसटीचे फुल तिकीट काढावे लागणार )
तुमचाही फोन गरम होत असेल तर अशाप्रकारे घ्या काळजी…
- फोनच्या कव्हरमुळे (Cover)अनेकदा समस्या निर्माण होऊ शकतात. बहुतेक लोक त्यांच्या फोनला बॅक कव्हर वापरतात, यामुळे तुमचा फोन संपूर्ण पॅक होतो. तुमचा फोन तापत असताना कव्हर वापरू नका फोनला हवा लागू द्या. तसेच फोन चार्जिंगला लावताना कव्हर काढा.
- जेव्हा फोनची बॅटरी कमी होते. तेव्हा प्रोसेसर लोड होतो. यामुळे बॅटरीवर सुद्धा दाब येतो आणि फोन गरम होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे बॅटरी कमी झाल्यावर पॉवर सेव्हिंग मोड वापरा, जेव्हा बॅटरी कमी असेल तेव्हा GPS, डेटा बंद करा यामुळे तुमचा फोन गरम होणार नाही.
- तुमचा कॅमेराही डिव्हाइस गरम करू शकतो. फोनमध्ये सतत फोटो क्लिक करणे, व्हिडिओ काढणे यामुळे फोन गरम होतो.
- ऑटो ब्राइटनेस ( Auto brightness) हा पर्याय सुरू ठेवा. जर तुम्हाला फोन गरम करणे टाळायचे असेल तर हे फिचर फोनमध्ये कायम सुरू ठेवा. ऑटो ब्राइटनेस हा फिचर पर्यावरणातील दृष्यमानतेनुसार तुमचा स्मार्टफोन brightness adjust करते.
- अनावश्यक अॅप सुद्धा तुमचा फोन गरम करू शकता. स्मार्टफोन वापरताना बॅकग्राउंडमध्ये चालणारे अॅप्स प्रोसेसर सुरू ठेवतात यामुळे बॅटरीवर परिणाम होऊन तुमचा फोन गरम होऊ शकतो.