पवारांच्या फोननंतर हितेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, माझी भूमिका…

167

राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता विधानसभेतील अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचे मत महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपकडून अपक्ष आणि इतर पक्षांची मनधरणी करण्यात येत आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी पक्षाचे महत्व फार मोठे आहे.

त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करुन चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या गोष्टीची चर्चा असतानाच आता हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी भूमिका 10 जून रोजी स्पष्ट होईल, असे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः कितीही दावे झाले तरी निकालानंतरच कळणार अपक्षांची साथ कोणाला?)

माझी भूमिका तेव्हाच स्पष्ट होईल

शरद पवार यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशाच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून शरद पवार यांना ओळखले जाते. त्यामुळे ते देशातल्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याशी बोलू शकतात. त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. त्यानुसार आता माझी भूमिका काय आहे ती 10 जून रोजी स्पष्ट होईल. कुठलीही भूमिका अशी आधीच सांगणं हे चुकीचं आहे, त्यामुळे आता मी त्याबाबत काहीही बोलणार नसल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

ते त्यांचं कर्तव्यचं

ग्राम पंचायत, पंचायत समिती, महापालिका, आमदारकी, खासदारकीच्या निवडणुकांना आम्ही आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांनाही जाऊन कामं करायला सांगतो. त्यामुळे ज्या पक्षांचे उमेदवार राज्यसभेसाठी उभे राहिले आहेत त्यांनी तर ती निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत, ते त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे मला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे सर्व प्रमुख नेते भेटले आणि त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः अखेरीस बविआच्या मतांसाठी शरद पवारांची मध्यस्थी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.