महापालिकेच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्ट मार्ग व एस. व्ही. रोड या जंक्शनवर आणि कल्पना चावला चौक याठिकाणच्या उड्डाणपूलाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांमध्येच हे पूल आता वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. हे पूल सुरु झाल्यास एस.व्ही. रोड, कल्पना चावला चौकवरील वाहतूक कोंडीतून आता बोरीवलीकरांची सुटका होणार आहे.
वाहतूक कोंडीतून आता बोरीवलीकरांची सुटका
बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्टड मार्ग व एस. व्ही. रोड या जंक्शनवर आणि कल्पना चावला चौक याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचचा निर्णय २५ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीने मान्यतेने एम.ई.पी.एल- स्पेको या संयुक्त भागीदारातील कंपनीला विविध करांसह १६१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या पुलाचे बांधकाम १५ नोव्हेंबर २०१८ रोजी हाती घेण्यात आले. त्यामुळे हे काम पावसाळा वगळून २४ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु कोविड काळात हे काम काही प्रमाणात थांबले असले तरी त्यानंतर हे काम पूर्ण केले आहे.
हे काम सुरु असतानाच बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्टड मार्ग व एस.व्ही.रोडवरील या जंक्शनवरवर तसेच कल्पना चावला चौक याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे याचा खर्च १६१ कोटी रुपयांवरून हा खर्च आता विविध करांसह याचा खर्च आता ६५१ कोटींवरून पोहोचला आहे. या रस्त्यांवरील या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून करिअप्पा उड्डाणपूलाच्या पूर्वेकडील उतार ते पश्चिम दुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पुढे वाढवण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिमेकडील लिंक रोडवरील पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणारी मुक्त मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विस्तारीत पुलाचे काम सुरु असून जे काम हाती घेण्यात आले आहे ते काम आता पूर्ण झाले.
( हेही वाचा : पवारांच्या फोननंतर हितेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, माझी भूमिका… )
याबाबत पूल विभागाचे प्रमुख अभियंता सतीश ठोसर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पुलाचे काम आता पूर्ण झाले असून विस्तारीत पूलाचे काम सुरु आहे. १५ मीटर रुंद आणि ९३० मीटर लांबीचे हे पूल आहे. त्यामुळे लवकरच हे पूल वाहतुकीसाठी खुले केले जाईल,असे ठोसर यांनी सांगितले. हे पूल खुले झाल्यास एस.व्ही. रोड व कल्पना चावला मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. या मार्गावरून थेट लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विनाअडथळा जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community