मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सांगलीच्या शिराळा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. राज ठाकरे यांना वॉरंट जारी केल्यानंतरही ते हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने पुन्हा वॉरंट जारी केला असून ११ जुलै रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. वॉरंट निघूनही हजर न राहिल्याने त्यांना बुधवारी अजामीन पात्र वॉरंट बजाविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन अर्ज दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वारंट आदेश रद्द करण्यात आला आहे. मात्र राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊन देखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. म्हणून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश देऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – …तर राज ठाकरेंना होऊ शकते अटक; मुंबई पोलीस आयुक्तांनी केले स्पष्ट)
मिळालेल्या माहितीनुसार, शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात नियमित फौजदारी खटला सुनावणी झाली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आरोपी क्रमांक ९ शिरीष पारकर हे आरोपी क्रमांक १० म्हणून सहभागी आहेत. यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी बुधवारी न्यायालयात हजर राहून जामीन दिला. यावेळी न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध केलेला अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला. न्यायालयाने पारकर यांना १५ हजार रुपयांच्या जामिनावर आणि ७०० रुपये खर्चाची दंडाची रक्कम भरून जामीन मंजूर केल्याची माहिती आहे.
Join Our WhatsApp Community