गेल्या आठवड्याभरापासून पूर्वमोसमी पावसाच्या सरींचा अंदाज देणा-या वेधशाळेला अखेर पूर्वमोसमी पावसाने अखेर गुरुवारी भल्या पहाटे खरे ठरवले. मुंबईकर साखर झोपेत असताना मुंबईतील बहुतांश सर्वच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसल्यात. सकाळी चाकरमनी मुंबईकरांना कार्यालयीन वेळा गाठताना हलक्या मातीचा सुगंध, ओले रस्ते पावसाच्या आगमनासाठी आतुर करत होते.
कोणत्या भागात पडला पूर्वमोसमी पाऊस
दक्षिण मुंबईत कुलाबा, लालबाग, दादर, माटुंगा तर मध्य मुंबईत कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड आदी परिसरांत मध्यरात्री हलका पूर्वमोसमी पाऊस झाला. पश्चिम उपनगरांत किनारपट्टीच्या भागांत त्या तुलनेत पावसाचा फारसा जोर नव्हता. सकाळच्या साडेआठच्या नोंदीत मुंबईत कुलाबा परिसरात केवळ १ मिमी पावसाची नोंद झाली.
(हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट)
आज, उद्याही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
आज आणि उद्याही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली. पावसाच्या हलक्या सरी असल्याने दिवसभरात घामाच्या धारा आणि कमाल तापमानात फारसा फरक पडणार नाही. आज कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community