संपूर्ण देशभरात भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे म्हणूनच बहुतांश लोक कुठेही जाताना रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि भारतीय रेल्वेच्या IRCTC वेबसाइट/अॅपद्वारे ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कित्येकदा IRCTC वेबसाइटवरून तिकीट बुक करताना तिकीट बुक होत नाही, मात्र आपल्या अकाऊंटमधून पैसे कट होतात. अशापरिस्थीत नेमके काय करावे आपल्याला कळत नाही. मात्र तिकीट बुक झालेले नसताना तिकीटाची रक्कम अकाऊंटमधून गेल्याने आपल्याकडे मनस्ताप केल्याशिवाय काहीच पर्याय राहत नव्हता. मात्र आता हे पैसे प्रवाशांना परत मिळवण्यासाठी IRCTC पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
(हेही वाचा – IRCTC: ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी)
तिकीट बुक करण्यासाठी हे आहेत उपलब्ध पर्याय
IRCTC कडून प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुक करण्याचे आणि ते तिकीट रद्द करण्याचे पर्याय दिले जातात. ऑनलाईन तिकीट बुक करताना तेथे पैसे भरण्यासाठी देखील विविध पर्याय उपलब्ध असतात. या पर्यायांचा वापर प्रवासी आपल्या गरजांनुसार करू शकता. जसे की तिकीट बुकिंग आणि पैसे भरण्यासाठी IRCTC कडून नेट बँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्ड, ई वॉलेट, डिजिटल वॉलेट असे पर्याय देण्यात आले असून ते वापरले जातात. या पर्यायांचा वापर करून युजर्सकडून अनेकदा ऑनलाईन तिकीट बुक केले जाते. यावेळी अनेक समस्या युजर्सना भेडसावत असतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून दर सेकंदाला हजारोंच्या संख्येने प्रवासी तिकीट बुक करत असतात. अशावेळी युजर्सच्या अकाऊंटमधून पैसे कट होतात मात्र तिकीट बुक झालेले दिसत नाही.
असे मिळणार कट झालेले पैसे
हे तिकीट बुक करताना इंटरनेट नेटवर्क मध्येच गेल्यामुळेही ही समस्या येऊ शकते. अशा परिस्थितीत एखाद्या युजरच्या अकाऊंटमधून पैसे कट झाल्यास युजर पुन्हा त्यांच्या IRCTC अकाऊंटवर येतात. मात्र पैसे कट झाल्यास प्रवाशांनी काळजी न करता रेल्वेकडून ते पैसे परत दिले जातात. युजर्सना यासाठी फार काहीच करावे लागणार नाहीये. रेल्वेच्या दोन ते तीन कार्यालयीन दिवसांमध्ये तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटवर परत पाठवण्यात येतात.