कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये कोविड भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली होती. या संदर्भात उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिले होते. परंतु एसटी महामंडळाने केवळ एक महिन्याचा प्रोत्साहन भत्ता दिली आणि ८ महिन्याचा भत्ता अद्याप एसटी कर्मचाऱ्यांनी दिला गेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा : दुसरे महायुद्ध, मुंबईचा डबेवाला ते ऑनलाइन ऑर्डर; Food वितरण प्रणालीचा रंजक इतिहास)
कोरोना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित
कोरोनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. अशा स्थितीत संचारबंदी लागू केल्यामुळे केवळ एसटी महामंडळाच्या बसेसमधून विविध ठिकाणी अडकलेले विद्यार्थी परप्रातीयांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले. २३ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रत्यक्ष कामगिरी बजावणाऱ्या एसटीच्या चालक-वाहक, लिपिक, पर्यवेक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा असे परिपत्रक एसटी महामंडळाने काढून राज्यभरातील विभागीय कार्यालयांना पाठविले, परंतु अद्याप हजारो कर्मचारी भत्त्यापासून वंचित राहिले आहेत.
( हेही वाचा : तरुणाने बेस्ट बसची काच फोडली…व्हिडिओ व्हायरल )
कोरोनाच्या काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांना सेवा दिली, अशा कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने घोषित केलेला प्रोत्साहन भत्ता मिळणे हा त्यांचा अधिकार आहे असे एसटी कामगार संघटनांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community