मोदी सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance)3 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे केंद्रीय कर्मचा-यांच्या पगारात वाढ झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या पगारात चांगलीच वाढ झाली आहे. पण आता याचाच परिणाम म्हणून आता केंद्रीय कर्मचा-यांच्या वाहन भत्त्यात(Travel Allowance)देखील वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कर्मचा-यांचे पगार आता चांगलेच वाढणार आहेत.
(हेही वाचाः Ration Card Cancellation : आता तुमचे रेशन कार्ड होऊ शकते रद्द, हे आहेत नवे नियम)
पीएफ आणि ग्रॅच्युटीमध्येही होणार वाढ
महागाई भत्ता वाढल्यानंतर आता केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या वाहन आणि सिटी भत्त्यात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खरंतर नियमाप्रमाणे महागाई भत्ता वाढला की या भत्त्यांमध्ये वाढ होणे हे स्वाभाविक असते. तसेच यामुळे कर्मचा-यांच्या पीएफ(Provident Fund)आणि ग्रॅच्युटीमध्ये देखील वाढ होणार आहे. जुलै महिन्यापासून ही वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढल्यामुळे त्यासोबतच या तीन भत्त्यांमधील वाढीचा फायदाही त्यांना मिळणार आहे.
(हेही वाचाः ‘या’ बँकांमध्ये तुमचं अकाऊंट आहे? मग तुम्हाला लोनसाठी होणार फायदा! RBI चा मोठा निर्णय)
तीन टक्क्यांपर्यंत वाढ
केंद्रीय कर्मचा-यांचा DA वाढल्यामुळे त्यांचा हाऊस रेंट अलाऊंस आणि ट्रॅव्हल अलाऊंस वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ होणार असल्याने आता त्यांचा भत्ता 34 टक्क्यांवरून 37 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचा-यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे.
Join Our WhatsApp Community