हनुमान चालीसा म्हणायची असेल तर तिकडे काश्मीरमध्ये जाऊन खुशाल म्हणा, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना फटाकरून काढले होते, पण आता नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि नाहक वाद घालणाऱ्या राणा दाम्पत्यांना फटकारून काढले होते. गुरुवारी, ९ जून रोजी नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या सभेवर आपली प्रतिक्रिया दिली.
औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान दिले होते, त्यावर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी आधी मातोश्री येथे येऊन हनुमान चालीसा म्हणावी. ज्या दिवशी मुख्यमंत्री हनुमान चालीसा वाचतील, त्यानंतर त्याच दिवशी आम्ही काश्मीर येथे हनुमान चालीसा म्हणण्याची तारीख जाहीर करू, असे प्रती आव्हान त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले.
(हेही वाचा भाजप विधानपरिषदेसाठीही आक्रमक, सहाव्या जागेसाठी सदाभाऊंना पाठिंबा)
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
काश्मिरी पंडितांनी पुन्हा घरे सोडली आहेत. घर, शाळा, कार्यालयात जावून गोळ्या घालत आहेत. पण कुणालाच काही पडलेली नाही. हिंमत असेल तर तिकडे काश्मीरमध्ये जावून हनुमान चालीसा पठण करा. उगाच कुठेतरी दुधाचा अभिषेक करताय. अरे हे नामर्दाचे हिंदुत्व आमच्याकडे नाही. काश्मिरी पंडितांची आधी रक्षा करा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्याला लगावला
Join Our WhatsApp Community