मध्य रेल्वे अप धीम्या मार्गावर, अप आणि डाऊन जलद मार्गावर, कल्याण-वसई कॉर्ड लाइनसह ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गावर क्रेन वापरून कोपर रेल्वे स्थानकावरील ६.० मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी गर्डर टाकण्यासाठी रात्रीकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे करणार आहे.
( हेही वाचा : ‘प्लास्टिक स्ट्रॉ’वर केंद्राची बंदी, अमूलचा मात्र विरोध )
या दिवशी घेण्यात येणार ब्लॉक
११ व १२ जून २०२२ (शनिवार/रविवार रात्रीची वेळ)
ब्लॉकचा कालावधी- ००.३० ते ०३.३०
लोकल गाड्या होणार रद्द
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.०८, २३.५१, ००.०४ वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची डाउन मार्गावरील सेवा आणि अंबरनाथ येथून २१.३५, २२.०१ व २२.१५ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठीच्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.
अप मेल/एक्स्प्रेस गाड्या अशा वळवल्या जातील
ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिताची कोणार्क एक्स्प्रेस कर्जत -पनवेल -दिवा मार्गे वळवली जाईल आणि कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिवा येथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि गाडीच्या नियोजित वेळेच्या २० मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी पोहोचल.
अप मेल/एक्सप्रेसची स्थिती अशी असेल
ट्रेन क्रमांक 12810 : हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल कल्याण स्थानकावर नियमन केले जाईल आणि निर्धारित वेळेच्या वेळेस २० मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
डाउन मेल/एक्स्प्रेस :
खालील गाड्या दिवा आणि कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी पोहचतील.
11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -अमृतसर एक्सप्रेस २३.३० वाजता.
11041 दादर सेंट्रल – साईनगर शिर्डी एक्सप्रेस ट्रेन २३.५५ वाजता सुटणारी,
22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी महानगरी एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.१० सुटणारी.
12811 लोकमान्य टिळक टर्मिनस- हाटिया एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.१५ सुटणारी,
22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.३५ सुटणारी.