हॉटेलांत आखताहेत ‘पहेलवान’ डावपेच, कोणाला मिळणार धोबीपछाड?

137
राज्यसभा निवडणुकीला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या रणनीतीला जोर आला आहे. त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची बैठक हॉटेल रिट्रीट येथे, शिवसेनेच्या आमदारांची बैठक हॉटेल ट्रायडेंट येथे तर हॉटेल ताज येथे भाजपच्या आमदारांची बैठक होत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक मात्र थेट राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. अशा प्रकारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोर बैठका सुरु झाल्या आहेत. शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीसाठी शरद पवार आणि भाजपासाठी देवेंद्र फडणवीस डावपेच आखत आहेत. यानिमित्ताने २०१९च्या विधानसभा निवडणुकीची आठवण झाली आहे. त्यावेळी शरद पवार आणि फडणवीस यांनी दोघांचा प्रचारात परस्परांचा पेहलवान उल्लेख केला होता.

कोणाची कोणत्या ठिकाणी तयारी? 

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे भाजप बॅकफूटवर गेली होती, मात्र मतदानाच्या आधी फडणवीस यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आणि भाजपमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यानंतर लागलीच भाजपच्या आमदारांची हॉटेल ताज मध्ये बैठक सुरु झाली. त्याठिकाणी चर्चा विनिमय सुरू झाला असून आमदारांना त्यांची मते बाद होणार नाही, यासाठी प्रशिक्षण सुरु आहे. तसे स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते दुसरीकडे राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आता प्रत्यक्ष शरद पवार यांनी सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसनेही अशीच तयारी केली आहे. त्यासाठी प्रात्यक्षिके सुरु आहे. पहिल्या पसंतीचे मत काँग्रेसला आणि दुसऱ्या पसंतीचे मत शिवसेनेला देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी मॉकड्रील घेण्यात आले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.