आता राष्ट्रपती निवडणुकीसाठी रणनीती! भाजप निश्चिंत, सोनिया गांधी अलर्ट

162

राज्यात एका बाजूला राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीच राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्याने आता या निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपला कसलीही चिंता नाही, मात्र विरोधक संघटीत होण्याच्या तयारीत आहेत.

राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा

विरोधकांची आधी समविचारी पक्षांची बैठक होईल आणि नंतर राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार ठरवण्यात येईल, असे सोनिया गांधी यांनी सांगितल्याचे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी विरोधक संघटीतपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, असे सांगितले. राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, सहाव्या जागेसाठी चुरशीचा मुकाबला असताना राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व पाहायला मिळू शकते. संसदेतील भाजप खासदारांची संख्या, अनेक राज्यांमधील आमदारांची संख्या पाहता ही निवडणूक भाजपला सोपी जाईल. मात्र या निवडणुकीसाठी विरोधकही कामाला लागले आहेत. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा गुरुवारी, ९ जून रोजी दुपारी झाली. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार संजय राऊत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, मंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक विरोधकांना अवघड जाईल, असे मानले जात आहे. त्यामुळे विरोधक कोणाला उमेदवारी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा राज्यसभा निवडणुकीतील मतांचा कमी झाला ‘कोटा’! कोणाचा ‘फायदा’, कोणाचा ‘तोटा’?)

राष्ट्रपतीपदासाठी केव्हा होणार निवडणूक?

निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तारीख जाहीर केली आहे. १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होईल. २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई असलेले पेन देण्यात येईल. मतदान करताना लोकप्रतिनिधींना १,२,३ असा पसंतीक्रम ठरवता येईल. पहिली पसंती न सांगितल्यास मत रद्द ठरवले जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.