राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आता काही तास उरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप हे दोघे एक एक मतासाठी धडपडत आहेत. याकरता आमदारांना कोणत्याही परिस्थितीत असले तरी त्यांना मतदानासाठी मुंबईत आणण्याची सगळी सोया केली जात आहे. भाजप असाच पुण्यातील एका आमदाराला मतदानासाठी चक्क एअर लिफ्ट करणार आहे.
सध्या भाजपचे पुण्यातील आमदार लक्ष्मण जगताप ही आजारी आहेत. त्यामुळे भाजप त्यांना हवाईमार्गाने मुंबईत आणणार आहे. तब्बर २४ वर्षांनी राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे भाजपने सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. पण पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आजारी आहेत. त्यामुळे त्यांना एअर लिफ्ट करून आणणार असल्याची शक्यता आहे.
लक्ष्मण जगताप यांची तब्येत अत्यंत नाजूक
राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी, 10 जून रोजी मतदान पार पडणार आहे. भाजपचे सर्व आमदार मुंबईत पोहोचले आहेत. पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघांचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मुंबईला नेणार कसे असा मोठा प्रश्न भाजप नेत्यांसमोर उभा ठाकला आहे. कारण आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे ते मतदानाला येतील का, आले तरी मतदान करू शकतील का, असा प्रश्न आहे. दोनच दिवसापूर्वी जगताप यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. त्यापूर्वी ते 50 दिवस ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे जगताप राज्यसभेच्या मतदानाला जाणार का? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.
Join Our WhatsApp Community