MHADA Lottery: पुण्यात 5 हजार घरांची लॉटरी, ‘या’ तारखेपर्यंत भरा अर्ज

200

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ६९ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते गुरुवारी गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत सुरुवात झाली. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकरनगर येथील कार्यालयात काढली जाणार आहे.

कधीपर्यंत करता येणार अर्ज

दिनांक ९ जून रोजी सायंकाळी ५ पासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. ९ जुलै रोजी सायंकाळी ५ पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार १० जून रोजी सकाळी १० पासून अर्ज करू शकतील. १० जुलै रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. ११ जुलै रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. १२ जुलै रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

(हेही वाचा – सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती, नियमात होणार हे बदल)

२१ जुलै रोजी निघणार सोडत

सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोडतीत २० टक्के सर्वसमा वेशक गृहनिर्माण योजनेअं तर्गत एकूण १९४५ सदनिकांचा सोडतीत समावेश असणार आहे. त्यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत ५७५ सदनिका, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १३७० सदनिका , म्हाडा गृहनिर्माण योजनेअं तर्गत २७९ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील १७० सदनिका, तर म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २ हजार ६७५ सदनिकांचा समावेश असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.