राज्यसभा निवडणुकीपूर्वीच MIM ने स्पष्ट केली भूमिका, ‘मविआ’लाच मत देणार

144

राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज निवडणूक होत असून महाविकास आघाडीने आणि भाजपने विजय आमचाच होईल असा दावा केल्याचे सांगितले जात आहे. या राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीच चुरस आणखी वाढणार आहे. या दरम्यान, एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. मतदानाच्या आधल्या दिवशी रात्री उशिरा इम्तियाज जलील यांनी मविआच्या नेत्यांची भेट घेतली आणि पहाटे पाचच्या सुमारास एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे.

MIM ने स्पष्ट केली भूमिका

एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मते मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. पाठिंबा मागायचाच असेल, तर तो उघडपणे मागा. आमच्या मतदारसंघातील विकासकामं होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली होती. आज शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा – पावसाळ्यापूर्वी १२८ रस्त्यांची कामे पूर्ण, शहरातच ८८ नवीन रस्ते बनले)

काय म्हणाले इम्तियाज जलील 

भाजपाचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युतीमध्ये असलेल्या शिवसेनेसोबत आमचे वैचारिक मतभेद कायम राहतील, असे इम्तियाज जलील आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. तर एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.