राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असून पहिल्या दीड तासात ५० टक्के मतदान पूर्ण झाले आहे तर साडे बारा पर्यंत एकूण १४३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यापैकी भाजपच्या ६० हून अधिक आमदारांनी मत दिले आहे. यादरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून पुन्हा एकदा भाजपला चिमटा काढला आहे.
(हेही वाचा – FIR नंतर ओवैसींना आणखी एक झटका, AIMIM च्या 30 जणांना अटक)
आज होणाऱ्या मतदानात आकडे स्पष्ट दिसतील, असे राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. महाविकास आघाडीकडील आकडे जास्त झाले तरी भाजपला धक्का बसू नये, अशी अपेक्षा आहे, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला. संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर एक ट्विट केल्याचे पाहायला मिळाले. या ट्विटद्वारे संजय राऊतांनी भाजपाला पुन्हा एकदा डिवचल्याचे दिसते.
काय केले राऊतांनी ट्विट
झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!! असे म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद हे कोणापासून लपले नाही. तर राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. निवडणुकीमध्ये घोडेबाजार होत असल्याचेही आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जातोय. यामध्येच हे ट्विट राऊतांनी केले आहे.
Join Our WhatsApp Communityझुठी शान के परिंदे ही
ज्यादा फडफडाते हैं…!
बाझ की उडान मे
कभी आवाज नही होती..!!
जय महाराष्ट्र..!!! pic.twitter.com/BpWAngwY2U— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022