खोटा आव आणणा-यांची लगेचच फजिती होते; संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

129

राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर,  छत्रपती संभाजी राजे यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. वाघाचे पांघरुण घेतल्यावर वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही. असा तुकोबांचा अभंग ट्वीट करत संभाजी राजेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

असे आहे संभाजीराजेंचे ट्वीट

छत्रपती संभाजी राजे यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, संभाजीराजेंनी हे ट्वीट केले आहे. वाघासारखे पांघरुण घेतल्यावर आपण वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणा-यांची लगेचच फजिती होते, अशा आशयाचे ते ट्वीट आहे.

( हेही वाचा: Sharad Pawar on Rajya Sabha Election: हा चमत्कार मान्य करावा लागेल; पवारांची निकालावर प्रतिक्रिया )

 

शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही

संभाजीराजे यांच्या राष्ट्रपती नियुक्ती खासदारकीचा 3 मे रोजी कार्यकाळ संपला. त्यानंतर त्यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. महाविकास आघाडीत सहावी जागा शिवसेनेला मिळाल्यामुळे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याची विनंती केली होती. परंतु, संभीजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर स्वीकारली नाही. त्यामुळे सहाव्या जागेवरुन चांगलेच राजकारण सुरु झाले होते. शेवटी शिवसेनेने कोल्हापूरटे शहर प्रमुख संजय पवार यांना जागेसाठी उमेदवारी दिली.

त्यामुळे स्वाभिमान राखण्यासाठी संभजीराजे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु आता शिवसेनेचा उमेदवार संजय पवार हे पराभूत झाल्यानंतर, त्यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.