कोरोना काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या त्यामुळे अलिकडे लोक मिळेल ती नोकरी स्वीकारत आहेत. महिलांना घर सांभाळून नोकरी करावी लागत असल्याने अनेक महिला करिअरच्या मध्येच ब्रेक घेतात, याच संदर्भात सेंटर ऑफ इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या अहवालात माहिती देण्यात आली आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला )
मागील ५ वर्षांमध्ये देशातील सव्वा कोटी महिलांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षात जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांच्या काळात तब्बल २५ लाख महिलांचा रोजगार गेला आहे. अशी माहिती सेंटर ऑफ इंडियन इकॉनॉमी च्या अहवालात देण्यात आली आहे.
महिलांची नोकरी जाण्याची कारणे
- प्रसूतीरजा १२ ऐवजी २६ आठवडे केल्याने महिलांना रोजगार देण्यास टाळाटाळ.
- शहरी भाग सोडून इतर भागात महिलांना बाहेर जाऊन काम करण्यास प्रोत्साहन देत नाही.
- स्टार्टअप् कंपन्यांमध्ये पुरुषांना प्राधान्य दिले जाते.
- बाळंतपणानंतर बहुतांश महिला नोकरी सोडून देतात.
- १०० महिलांपैकी १२.३ महिलांना कोरोनाकाळात नोकरी गमवावी लागली.