शिक्षण ते लग्नापर्यंत ‘या’ योजनांचा लाभ घेत असे जमा करा पैसे!

143

आयुष्यात गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक उद्धिष्टांवर होतो. मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सर्व निधी कसा तयार करावा यासाठी काही टिप्स…

गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय पाहणे गरजेचे आहे. यामध्ये परतावा आणि जोखीम या बाबी तपासल्या पाहिजेत. जर गुंतवणूक गरजेनुसार असेल तर ध्येय गाठणे सोपे जाईल.

कुठे करु शकता गुंतवणूक?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी योजना या तीन सरकारी योजनांचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करुन तुम्ही तुमची विविध आर्थिक उद्धिष्टे नक्की पूर्ण करु शकता. या सर्व योजनांचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे कोणती योजना चांगली हे तुमच्या ध्येयावर अवलंबून आहे.

भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)

  • 7.1 टक्के वार्षिक व्याज या योजनेंतर्गत दिले जाते.
  • यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 1 कोटींहून अधिकचा फंड सहज तयार करु शकता. यामध्ये तुम्हाला मिळणारे रिटर्न पूर्णपणे करमुक्त आहेत.
  • रुपये 500 किमान रक्कम गुंतवणूक.
  • कमाल गुंतवणूक 1.5 लाख प्रतिवर्ष.
  • पीपीएफ खात्यातील पैसे 15 वर्षांपर्यंत काढता येतात. यात 25 वर्षांपर्यंत काढता येतात. यात 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकता.
  • तुम्ही तुमचे पैसे 15.20 किंवा 25 वर्षांनी काढू शकता.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएसई)

  • 6.8 टक्के परतावा या योजनेत वार्षिक मिळतो.
  • यात केलेल्या गुंतवणुकीला कलम 80 सी. अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.
  • रुपये 1 हजार किमान गुंतवणूक आवश्यक.
  • कमाल रक्कम कितीही गुंतवू शकता, मर्यादा नाही.
  • लाॅक ईन कालावधी 5 वर्षांचा आहे.
  • या योजनेत मुलांच्या नावानेही खाते उघडता येते.

( हेही वाचा: Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा! )

सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय)

  • 7.6 टक्के वार्षिक व्याज सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर आहे.
  • मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी अतिशय चांगली सरकारी योजना.
  • रुपये 250 किमान गुंतवणूक.
  • तुम्ही यामध्ये 0 ते 10 वर्षांच्या मुलीच्या नावावर ती 14 वर्षांची होईपर्यंत गुंतवणूक करु शकता.
  • मुलगी 21 वर्षांची झाल्यावर व्याजासह एकरकमी रक्कम मिळेल.
  • हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.