हार्बर मार्गावरील माहिम आणि वांद्रे मार्गावर येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून या मेगाब्लॉकनंतर पुढील १५ दिवस माहिम रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाही. त्यामुळे आपण माहिमला उतरणार असाल तर आपल्या वांद्र्याला जावून तिथून माहिमला परतावे लागणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून किंवा त्या मार्गाने आपण माहिमच्या दिशेने प्रवास करणार असाल तर आपल्याला पुढील १५ दिवस वेळेचे नियोजन करत प्रवास करावा लागणार आहे.
मोठा ब्लॉक घेण्यात येणार
येत्या रविवार १२ जून २०२२ रोजी सकाळी १०.५५ ते सायंकाळी ४.५५ या वेळेत पश्चिम रेल्वे वांद्रे आणि माहीम जंक्शन दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर माहीम येथे कर्व पुन्हा संरक्षित करण्याच्या संदर्भात मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
( हेही वाचा : दिलासादायक! येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होणार, ९ टक्क्यांची घसरण)
हे ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर सर्व डाउन हार्बर मार्गावरील उपनगरीय गाड्या माहीम स्थानकावर १५ दिवस थांबणार नाहीत. त्यामुळे माहीमच्या प्रवाशांना वांद्रे मार्गे अप दिशेने प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे या पायाभूत कामांसाठी हाती घेण्यात येणाऱ्या ब्लॉकनंतर हार्बर मार्गावरील माहिम स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना आता वेळेचे नियोजन करत प्रवास करावा लागणार आहे.
Join Our WhatsApp Community