अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी जवळ (अकोला शहरापासून २३ किमी अंतरावर) शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून मालमत्तेचे वा कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, हवामान विभाग अकोलाचे वैज्ञानिक सहायक मिलिंद धकिते व कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजीकल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या आधारे माहिती दिली आहे.
(हेही वाचा – पुलवामामध्ये लष्कराला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा)
काल सायंकाळी पाच वाजून ४१ मि.१८ सेकंदांनी या धक्क्याची नोंद झाली. २०.५३०N व ७७.०८०E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असून रिक्टर स्केल वर ३.५० इतकी तीव्रता नोंदविण्यात आली.या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही,असे प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community