अत्यंत अटीतटीच्या लढतीत राज्यसभेचे खासदार बनलेले धनंजय महाडिक कोल्हापूर परतले, परतीच्या प्रवासात पुणे येथून कोल्हापूर येथे जात असताना मध्येच धनंजय महाडिक यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी भेट झाली, तेव्हा महाडिक हे थेट शेट्टी यांच्या पाया पडले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
राजू शेट्टी यांनी फेसबुकमधून सांगितलं प्रसंग
मागील आठ वर्षे धनंजय महाडिक यांचा पराभव हा शद्ब पाठ सोडत नव्हता. त्या पराभवावर मात करत अखेर धनंजय महाडिकांनी विजयाचा झेंडा रोवला. मुंबईत भाजपच्या कार्यालयात विजयाचे जंगी सेलिब्रेशन करुन धनंजय महाडिक कोल्हापूरकरांच्या वतीने सत्काराला हजर झाले आहेत. तत्पूर्वी पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना कराडमध्ये महाडिक-शेट्टींची भेट झाली. धनंजय महाडिक यांच्या भेटीविषयीचा प्रसंग स्वतः राजू शेट्टींनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितला. पुण्याहून कोल्हापूरला येत असताना कराड येथे धनंजय महाडिक यांची भेट झाली. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार केला, असे राजू शेट्टींनी सांगितले. धनंजय महाडिक यांनीही ट्विट करुन राजू शेट्टींचे आभार मानले आहेत. राजू शेट्टींनी कराड येथे स्वागतपर सत्कार केला. विजयश्री संपादन केल्याबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी केलेल्या प्रेमपूर्ण सत्काराबद्दल त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे धनंजय महाडिकांनी आभार मानले.
(हेही वाचा आता विधान परिषदेचा आखाडा! काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचा ‘संजय पवार’ होणार!)
कोल्हापुरात जंगी स्वागत
धनंजय महाडिक यांचे कोल्हापुरात आगमन झाले. हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला हजर होते. फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. फटाक्यांची आतिषबाजी सुरु होती. डीजेच्या तालावर कार्यकर्ते बेभान होईन नाचत होते. धनंजय महाडिक यांचा खास कोल्हापुरी फेटा घालून सत्कार करण्यात आला. त्यांच्या खांद्यावर विजयाचा गुलाल टाकून कार्यकर्त्यांनी त्यांनाही खांद्यावर घेतले. कार्यकर्त्यांबरोबर धनंजय महाडिकांनीही डीजेच्या गाण्यावर ताल धरला.
Join Our WhatsApp Community