पेण अर्बन बॅंकेच्या संदर्भातील खटल्याची सर्व कागदपत्रे वर्ग झाल्यानंतर, सोमवारी मुंबईच्या पीएमएलए कोर्टात पहिली तारीख आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या पैशातून संचालकांनी घेतलेल्या जमिनीवरील ईडीचा बोजा उतरवण्यासंदर्भात कारवाईस वेग येणार असून, त्यातून ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास लेखापरीक्षक विक्रम वैद्य यांनी दिल्यामुळे ठेवीदारांमध्ये उत्साह आहे.
( हेही वाचा: एसटीच्या ताफ्यात लवकरच खासगी बस! )
पेण अर्बन बॅंकेचा गेल्या अकरा वर्षांच्या लढ्याचा इतिहास लेखापरीक्षक वैद्य याने दीड तास ठेवीदारांसमोर कथन केला. या घोटाळ्याचे पैसे शोधण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे त्यांनी कथन केले. पेण अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांचे 774 कोटी रुपये चोरण्यात आले. या बॅंकेचा घोटाळा अतिशय गुंतागुंतीचा आहे. ईडीने आपल्या बॅंकेच्या जमिनीवर बोजा चढवला आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित आहेत. आता अलिबाग न्यायालयाकडून सर्व खटले ईडीच्या कोर्टात वर्ग झाल्यामुळे लढाई थोडी सोप्पी होण्याची आशा ठेवीदारांना आहे.
Join Our WhatsApp Communityनवीन नियमाप्रमाणे बॅंक अवसायनात न जाता ही विम्याची रक्कम मिळू शकते. परंतु, पेण बॅंक ही पाच लाखाच्या विम्यामध्ये बसते की नाही हे बघूनच पुढील निर्णय घ्यावा लागेल.
विक्रम वैद्य लेखापरीक्षक .