राज्यसभेत भाजपच्या दणदणीत विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी आता विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतही मोठं विधान केलं आहे. विधान परिषदेत भाजपचा सहावा उमेदवार निवडून येईल आणि तोही महाविकास आघाडीत असलेल्या असंतोषामुळेच, असा थेट इशारा फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
(हेही वाचाः विधान परिषदेचीही रणधुमाळी होणारच, अर्ज मागे घेण्याची मुदत संपली)
आमचे सर्व उमेदवार विजयी होतील
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. पण काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे न घेतल्यामुळे आता ही निवडणूक होणं अटळ आहे. महाविकास आघाडीतला अंतर्गत असंतोष हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे हा असंतोषच आम्हाला जिंकवून देईल आणि या निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचाः ‘अशी जोकरसारखी विधानं ते नेहमीच करतात’, फडणवीसांचा राऊतांना टोला)
मविआत असंतोष आहे
पाचवी जागा निवडून आणणं हे काही सोपं नाही, पण मला विश्वास आहे की आम्ही ती जागा जिंकू. महाविकास आघाडीत असंतोष तर आहेच, तसेच त्यांच्यात समन्वयाचा अभावही आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आमच्या बाजूने फार कमी लोक होते. तसेच हे मतदान खुलं होतं तरीही आमचे सर्व उमेदवार जिंकले. यावरुन त्यांच्यात असंतोष किती आहे ते समजत आहेच आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरही तो पहायला मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community