Online Ration Card: ऑनलाइन अर्ज करा, रेशन कार्ड थेट येईल घरा!

160

रेशन कार्डची आपल्याला अनेकदा गरज लागते. विशेषत: गरीब कुटुंबांना याचा अधिक फायदा होतो. तुमच्याकडे रेशन कार्ड नसल्यास तुम्ही घरबसल्या या कार्डासाठी Apply करू शकता. यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. जाणून घेऊया रेशन कार्ड काढण्याच्या सोप्या प्रक्रियेविषयी…

( हेही वाचा : बेस्ट कामगारांची भोजन व्यवस्था पूर्वीप्रमाणे करा; अन्यथा भाजपने दिला आंदोलनाचा इशारा)

ऑनलाइन रेशन कार्ड कसे काढाल? 

  • वन नेशन वन रेशनकार्ड योजनेंतर्गत ही प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आली असून आता घरबसल्या शिधापत्रिका काढता येणार आहे.
  • रेशन कार्डासाठी सर्वप्रथम अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर वेबसाईटवर डाव्या बाजूस food security section मध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती भरावी लागेल.
  • यात तुम्हाला ओळखपत्र, निवासी पत्ता, उत्पन्न हमीपत्र, जात प्रवर्ग ही महत्वाची माहिती भरून कागदपत्र जोडावी लागतील. शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होईल.
  • यानंतर संबंधित अधिकारी प्रत्यक्ष येऊन पडताळणी करेल. अर्जदाराने सादर केलेले हमीपत्र आणि अन्य माहिती पडताळणी केल्यानंतर हा अधिकारी अहवाल कार्यालयात सादर करेल. त्यानंतर ३० दिवसांच्या आत पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे रेशनकार्ड घरी पाठवले जाईल.
  • रेशन कार्ड बनवण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. १८ वर्षांखालील मुलांची नावे त्यांच्या आई-वडिलांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट असतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.