पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे ‘हा’ वाहतूक मार्ग बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

136

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यातील देहू येथे येणार आहेत. त्यानंतर दक्षिण मुंबईतील राजभवन आणि वांद्रे- कुर्ला संकुल येथे होणा-या कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक पोलीस विभागाने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. मंगळवारी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत वांद्रे- कुर्ला संकुल परिसरातील काही भागांत प्रवेश बंदी केली आहे. तर, काही भागात पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत.

पर्यायी मार्ग वाहतूक विभागाकडून खुले

  • एमसीए मैदान गेट क्रमांक-3 समोर ओएनजीसी इमारत चौकातून पुढे ट्रायडंट हाॅटेल, साॅफीटल हाॅटेल, अमेरिकन वकिलातीकडे न जाता ओएनजीसी इमारत येथून उजव्या बाजूला वळण घेऊन विदेश भवन, अंबानी स्कूल पार्किंग समोरुन उजवे वळण घेऊन टाटा कम्युनिकेशन इमारतीमार्गे एमटीएनएल जंक्शनवरुन कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.
  • एमसीए मैदान बंद गेट क्रमांक-3 समोर ओएनजीसी इमारत चौकातून उजव्या बाजूला वळण घेऊन विदेश भवन अंबानी स्कूल पार्किंग अमेरिकन स्कूल येथून डावे वळण घेऊन ट्रायडंट व साॅफाटल हाॅटेलकरिता जातील.
  • कुर्ला रझाक जंक्शन, एमटीएनएल, प्लॅटीना जंक्शन, सिग्नेचर, सनटेक/ पन्हाळा इमारत चौक येथून अमेरिकन वकिलात मार्गे , जिओ वर्ल्ड सेंटर, एमसीए वांद्रे- कुर्ला संकुल कनेक्टर पुलाकडे न जाता अमेरिकन स्कूल पार्किंग उजव्या बाजूला वळून- विदेश भवन ओएनजीसी इमारत येथून डावे वळण घेऊन वांद्रे- कुर्ला संकुल कनेक्टर पूल व एनएससी जंक्शनकडे मार्गस्थ होतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.