IPL प्रसारण हक्कांच्या लिलावाच्या बाबतीत इंग्लिश प्रीमियर लीगला मागे टाकून दुस-या क्रमांकाची लीग बनली. आयपीएलच्या 2023-207 या 5 वर्षांसाठी पॅकेज ए व पॅकेज बीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. पॅकेज सीसाठी ई लिलाव सुरु आहे, तर डीसाठी मंगळवारी बोली लागेल. ईपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी 86 कोटी इतका प्रसारण हक्क आहे, तर आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी 107.5 कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार आहेत.
फक्त टीव्हीवर दाखवल्या जाणा-या सामन्यांचा विचार केला तर या लिलावातून बीसीसीआयला एका सामन्यासाठी 57.5 कोटी रुपये मिळतील, तर डिजिटल हक्कांमधून एका सामन्यासाठी 50 कोटी रुपये मिळणार आहेत. एकूण 107.5 कोटी रुपये मिळतील. 2018 मध्ये बीसीसीआयला या हक्कांमधून 16 हजार 347 कोटी रुपये मिळाले होते.
दुसरी सर्वांत महागडी लीग
आयपीएल ही प्रसारण हक्कांमधून पैसे कमावण्याच्या शर्यतीत आयपीएल ही दुसरी महागडी लीग ठरली आहे. त्यात आयपीएलला एका सामन्यासाठी 107.5 कोटी रुपये मिळणार आहेत.
( हेही वाचा: भारतावर सायबर अटॅक? देशभरातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक )
पॅकेज सीमध्ये दोन हजार कोटींची बोली
पॅकेज ए आणि पॅकेज बीचे लिलाव पूर्ण झाले असले तरी पॅकेज सी आणि डीचे लिलाव मंगळवारी पूर्ण होतील. त्यात पॅकेज सीमध्ये आणखी दोन हजार कोटींची बोली लागली असल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली. त्यामुळे एकूण रकमेचा आकडा 46 हजार कोटींवर गेला आहे. पॅकेज सी मध्ये भारतीय उपखंडात निवडक डिजिटल हक्कांचा समावेश करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community